Ladki Bahin Yojana payment date
राज्यात शनिवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये महायुतीला बहुमत मिळालं असून लाडकी बहीण योजनेचा पुढील हफ्ता सरकार स्थापन झाल्यावर जारी केला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. यावेळी महिलांना 1500 रुपये दिले जाणार आहेत. कारण मागच्या वेळी महिलांना एकत्रित 3000 रुपयांची रक्कम देण्यात आली होती.माझी लाडकी बहीण योजनेचा स्टेटस तपासण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटच्या या लिंकवर https://testmmmlby.mahaitgov.in/ जावं लागेल. इथे तुम्हाला लाभार्थ्यांचं स्टेटस पाहण्याचं ऑप्शन मिळेल, त्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. तुम्हाला मोबाईल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर असे दोन ऑप्शन दिसतील. त्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाकून मोबाईल ओटीपीवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुम्ही स्टेटस पाहू शकता.