या जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई जाहीर बघा निर्णय…

व्हाट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. (Nuksaan bharpaai 2024)

👉निर्णय

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर निश्चित करण्यात आले आहेत. केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्तीं व्यतिरिक्त राज्य शासनाने दि. 30/01/2014 च्या निर्णयानुसार अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे निश्चित केले आहे. (Nuksaan bharpaai 2024)दि. 22/06/2023 च्या शासन निर्णयान्वये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे.

दि.01/01/2024 च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर, 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानी साठी 02/ ऐवजी 03/ हेक्टरपर्यंतमदत देण्याची निश्चित करण्यात आले आहे. (Farmers scheme)

येथे बघा शासन निर्णय👉 क्लिक करा

जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 292057.50 लक्ष रुपये एवढा निधी वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.

Leave a Comment