kukutpalan yojana arj suru

 


जळगाव जिल्ह्यात जामनेर, मुक्ताईनगर, पारोळा, रावेर, यावल, भुसावळ, जळगाव तालुक्यातून खासगी भागिदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना करावयाची आहे. शासन निर्णयानुसार प्रत्येक तालुक्यात एका पात्र लाभार्थीची निवड ही जिल्हा निवड समितीमार्फत करण्यात येणार आहे. 


तालुकास्तरावरील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती -  जामनेर, मुक्ताईनगर, पारोळा, रावेर, यावल, भुसावळ जळगाव, अमळनेर यांच्यामार्फत प्रस्ताव आवश्यक व परिपूर्ण कागदपत्रांसह  या कार्यालयास 31 जानेवारी 2022 पर्यत सादर करावा. 


अधिक माहिती व अर्जाचा विहित नमुना पशुधन विकास अधिकारी (विस्तार),पंचायत समिती जामनेर, मुक्ताईनगर, पारोळा, रावेर, यावल, भुसावळ  जळगाव, अमळनेर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


याच बरोबर उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परांडा, कळंब , तुळजापूर , उमरगा  या पाच  तालुक्यांची निवड केलेली आहे.  

याच बरोबर लातूर जिल्ह्यातील चाकूर रेणापूर व शिरूर अनंपाळ येथेहि  अर्ज सुरु आहे 


इतर जिल्ह्यात अर्ज सूरु आहे कि नाही या बद्दल महित्यी आलेली नाही. अपडेट माहिती आली कि आपल्या  पोहचवू , शेतकऱ्यांची दिशाभूल करणे हा आमचा हेतू नाही 

आमच्या पर्यंत येणारी प्रत्येक माहिती आम्ही आपल्याला देत असतो आणि देत राहू

तरी इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पशुधन विकास अधिकारी (विस्तार),पंचायत समिती यांच्याकडे अर्ज सुरु आहे कि नाही चौकशी करावी यासंबंधित माहिती शेतकऱ्यांपर्यंत येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः चौकशी करावी 



4 Comments

  1. कुकुट पालन उस्मानाबाद कळम तालुका चालू आहे का

    ReplyDelete
    Replies
    1. कळम तालुका चालू आहे

      Delete
    2. याच बरोबर उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परांडा, कळंब , तुळजापूर , उमरगा या पाच तालुक्यांची निवड केलेली आहे. येथेहि अर्ज सुरु आहे

      Delete

Post a Comment

Post a Comment