2 लाखापर्यंतची कर्जमाफी
ठाकरे सरकार सत्तेत येताच 2 लाखापर्यंतची शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती. त्या दरम्यान राज्यातील तब्बल 31 लाख 73 हजार शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला होता. याकरिता राज्य सरकारच्या तिजोरीवर 20 हजार 250 कोटींचा भार पडला होता. असे असताना तिजोरीतील खडखडाट आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे प्रोत्साहनपर रक्कम आणि उर्वरीत 54 हजार शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी रखडली होती. आता या मार्च महिन्यातच ही कर्जमाफी निकाली काढली जाणार आहे.
घोषणा झाल्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचे काय असा सवाल आता विरोधकांकडून विचारला जात आहे. मात्र, घोषणाच नाही तर अंमलबजावणीसाठीही योग्य नियोजन केले आहे
या उर्वरीत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याचे (Minister of Co-operation) सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे. तसेच महिन्याअखेर सर्व प्रश्न मार्गी लावू असेही सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.
वरील माहिती संदर्भ tv९ मराठी तसेच कृषी मंथन या यू ट्यूब चॅनेल वरून घेतली आहे
काही अडचणी किंवा काही प्रश्न असतील तर सम्पूर्ण माहितीसाठी आपल्या व्हाट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा
إرسال تعليق